दौंड-बारामती रेल्वेच्या वेळेत बदल

पुणे – पुणे-दौंडदरम्यान रेल्वे ट्रॅक दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांमुळे दौंड स्थानकावरुन दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी सुटणारी दौंड-बारामती डेमू रेल्वे 25 ते 31 मार्चदरम्यान बंद राहणार आहे. बारामती स्थानकावरून सायंकाळी 4 वाजून 20 मिनिटांनी सुटणाऱ्या बारामती-पुणे पॅसेंजर रेल्वेच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे. ही गाडी बारामती-दौंडदरम्यान धावणार नाही, तर ती दौंडवरुन पुण्याकडे नेहमीच्या वेळेत येईल. हा बदल 25 ते 31 मार्चदरम्यान असेल, असे मध्य रेल्वेने सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)