दौंड-पुणे शटल फुलराणी वर्धापनदिनी आठवणींना उजाळा

पुणे- दौंड-पुणे शटल फुलराणीचा 42 वा वर्धापन दिन गुरुवारी साजरा करण्यात आला.
दौंड रेल्वे स्थानकात रेल्वे अधिकारी व सर्व दैनंदिन प्रवासी सकाळी उपस्थित होते. ज्येष्ठ महिला प्रवाशांच्या हस्ते केक कापून आणि दैनंदिन प्रवासी प्रदीप ससाणे व मुनाफ सय्यद यांनी इंजिनला पुष्पहार अर्पण केला.

दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघाचे सचिव विकास देशपांडे यांनी इंजिन चालकास पुष्प गुच्छ देऊन सन्मानित केले; तर कार्याध्यक्ष गणेश शिंदे यांनी गाडीचे गार्ड यांना पुष्पगुच्छ दिला. अय्युब तांबोळी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान केला. रेल्वे प्रशासनाने 42 व्या वर्धापन दिनाचे औचत्य साधून महिलांसाठी गुरुवारपासून एक अतिरीक्त बोगी इंजिनच्या मागे लावण्यात आली. एकूण आता महिलांसाठीचे दोन डबे शटलला असणार आहेत. एक डबा गार्डच्या पुढील बाजूस तसेच दुसरा इंजिनच्या मागील बाजूस असणार आहे.

-Ads-

यामुळे दौंड ते पुणे दरम्यान महिला प्रवाशांना प्रवास सुखकर झाला आहे. हा अतिरिक्त डबा लावण्यासाठी पुणे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले; तसेच सहायक यातायात निरीक्षक सुरेश जैन यांनी देखील मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर सातत्याने पाठपुरावा केला. महिलांच्या अतिरीक्त डब्याची मागणी दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघाने पुणे व सोलापूर दोन्ही विभागाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून मंजूर करून घेतली. यामुळे महिला प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, दौंड-पुणे शटल फुलराणीचे पुण्यात आगमन झाल्यावर पुणे मंडळाचे मुख्य प्रबंधक मिलिंद देऊस्कर आणि वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून प्रवाशांचे स्वागत केल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)