दौंड – नगर रेल्वे मार्गावरील बोगद्याचे काम अर्धवट

निमगाव खलु जवळचे अर्धवट काम सुरु करण्याची मागणी
श्रीगोंदा – दौंड ते नगर रेल्वे मार्गवरील रेल्वे फाटके कायमस्वरूपी बंद करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या रेल्वे मार्गावर ठिकठिकाणी पूल तयार केले. या पुलाच्या खालून वाहतूक सुरु झाल्याने या मार्गाच्या कडेला असणाऱ्या व रेल्वे मार्ग ओलांडून रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाश्‍यांचा वेळ वाचत असला तरी काही ठिकाणी हे कामे अर्धवट राहिली असल्याने या पुलाच्या खालून जाताना वाहनचालकांना अडचणीचा सामना आणि वेळप्रसंगी अपघातांना निमंत्रण द्यावे लागत असल्याने निमगाव खलु जवळ रेल्वे मार्गावर असणाऱ्या या पुलाच्या रस्त्याचे काम अर्धवट करण्यात आल्याने व संबंधित ठेकेदार कामाकडे फिरकत नसल्याने या परिसरातील कौठा, गार, आर्वी, अजनूज, आदी गावच्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
दौंड ते नगर या रेल्वे मार्गावर येणाऱ्या गावच्या रस्त्यावर रेल्वे प्रशासनाने पुलाचे काम केले आहेत. यात पुलाच्या खालून रस्ते काढून दिल्याने प्रवाश्‍यांना रेल्वे पुलामुळे आणि रेल्वे फाटकांचा ताण कमी झाल्याने वेळ वाचत आहे. मात्र तालुक्‍यातील निमगाव खलु जवळ करण्यात आलेल्या पुलाच काम अर्धवट करण्यात आल्याने याचा त्रास परिसरातील वाहन चालकांना होत आहे. या रस्त्याचे काम केले नसल्याने व काळी माती या रस्त्यावर असल्याने पुलाच्या रस्त्याच्या कामावर येताना जाताना वाहने घसरत आहेत. चिखल आणि पाणी रस्त्यावर असल्याने वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. काम करणारा ठेकेदार काम अर्धवट सोडून गेला असल्याने हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी या गावच्या परिसरातील श्रीकांत मगर, गणपतराव परकाळे, शाहूराजे शिपलकर, योगेश मगर, बाळासाहेब पवार, नितीन थोरात, मदन परकाळे, उमेश परकाळे आदींसह नागरिकांनी केली आहे.

रेल्वे रोखण्याचा इशारा
या बोगद्याचे काम जरी चांगले असले तरी ही कामे अर्धवट सोडून ठेकेदार गेला असल्याने या रस्त्याने व बोगद्यातून जाताना अपघात होत आहेत.दुचाकी घसरत आहेत.वाहतुकेला अडथळा होत असल्याने काम सुरु न केल्यास रेल्वे रोकोचा इशारा देण्यात आला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)