दौंड तालुक्‍यात दूधामध्ये भेसळीचे प्रमाण वाढले

नांदूर- दुधामध्ये पाणी रासायनिक पदार्थ टाकून भेसळ करण्याचे प्रकार दौंड तालुक्‍यामध्ये सर्रासपणे सुरू असून अन्न आणि औषध विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.
मानवी जीवनात दूध हा आपल्या आहाराचा अतिशय महत्तवाचा घटक असतो. दूध हे पूर्णान्न म्हणून ओळखले जाते. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये दुधाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन आणि दुगधव्यवसाय करत असतात. सध्या दुधाला प्रतिलिटर अतिशय कमी भाव असून सर्वसामान्यांना दुगधव्यवसाय करणे मुशकिल झाले आहे. त्यात जनावरंच्या खाद्यावरही मोठा खर्च होत आहे.
ग्रामीण भागातील अनेक खासगी आणि सहकारी दूध संस्थांवर दुधामध्ये विविध प्रकारची भेसळ केली जात आहे. दुधात युरिय, गलुकोज, चरबी, कोस्टिक सोडा तसेच गोडेतेलापासून पाण्यापर्यंत भेसळ करून मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांच्या आरोगयावर त्याचा परिणाम होत आहे. या गंभीर प्रकारामुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करत असलेल्या दूध व्यावसायिकांना दुधाचा धंदा करणे परवडत नसून अनेकांनी आपली जनावरे कमी बाजारभावामध्ये विक्री केली आहेत. भेसळ करणाऱ्या बड्या राजकीय धेंडावर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्यांमधून केली जात आहे. यातील अनेकांच्या घरी जनावरे नसतानाही दूध संस्थांमध्ये जाणारे दूध लक्षणीय असून यांची परिसरामध्ये चर्चा होत आहे. अन्न आणि औषध विभागाने यापूर्वी दौंड तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यातील गावांमध्ये कारवाई केली होती. मात्र, या कारवायांमध्ये केवळ दिखाऊपणा करण्यात आला असल्याची चर्चा आहे.

  • भेसळखोरांवर कारवाई करा
    भेसळ करणाऱ्याना तीन वर्षापर्यंत तुरूंगवासाची शिक्षा करणारा कायदा लवकरच तयार करण्यात येईल, अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत केली होती. यांची अमंलबजावणी करून भेसळखोरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)