दौंड तालुक्‍यातील शालेय मुलींना सायकलींचे वाटप

वरवंड- “टू व्हिल्स ऑफ होप’ या मोहिमेअंतर्गत दौंड तालुक्‍यातील शालेय मुलींना आणि आशा वर्कर्स यांना टाटा ट्रस्ट, पवार पब्लिक चॅरीटेबल ट्रस्ट, मेंटॉर फौंडेशन आणि एम्पथी फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने 3 हजार सायकलींचे वितरण शुक्रवारी (दि.13) खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम दौंड तालुक्‍यातील वरवंड येथील एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला.
यावेळी टाटा ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी रामचंद्र व्यंकटरामन, टाटाचे चीफ फायनान्सीयल आशिष देशपांडे, ईनीनंट पॅथॉलॉजीस्ट डॉक्‍टर इन मुंबईचे डॉ. मोहमद अली पाटणकर, हिरो सायकलचे हेड नीरज चंद्रा, नर्मदा बाल घर चॅरिटेबल ट्रस्टचे भारत मेहता, पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे चेअरमन, माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा महिलाध्यक्षा वैशाली नागवडे, अप्पासाहेब पवार, प्रवीण माने यांच्यासह आदी मान्यवर, विद्यार्थीनी तसेच तालुक्‍यातील आशा वर्कर्स यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थिनींनी सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला. यामध्ये तुमच्या मुलांची नावे काय आहेत? तुमच्या मुलांना यावर्षी किती मार्क मिळाली? तुमच्या पतीचे नाव काय? आदी प्रश्न विचारले यावेळी उपस्थित विद्यार्थिनींना सुळे यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
एका विद्यार्थीनीने तुम्ही राजकारणात कशा आल्या असे विचारल्यावर खासदा सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझे स्वप्न आहे की माझा बारामती मतदारसंघ हा देशातील एक नंबरचा मतदारसंघ असला पाहिजे. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक मुलगा आणि मुलगी शिकली पाहिजे. स्वतःच्या पायावर उभा राहिली पाहिजे. माझा मतदारसंघ हा देशातील पहिला कुपोषणमुक्त मतदारसंघ असला पाहिजे. बारामती मतदारसंघ हा देशातील पहिला असा मतदारसंघ आहे की जिथे सगळ्या आशा वर्कर्सना सायकल मिळणार तसेच हेल्थ कार्ड मिळणार आहे.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी उपस्थित विद्यार्थिनींना पुढे शिकून काय व्हायचे आहे? असे विचारले, यावेळी काही विद्यार्थिनींनी डॉक्‍टर, वकील, शिक्षक, कलेक्‍टर, वैमानिक आदी व्हायचे असल्याची दिलखुलास उत्तरे दिली.
शाळा घरापासून दूर अंतरावर असल्याने मुली शिक्षणापासून वंचित राहू नये. घरापासून शाळेचे अंतर कमीत कमी वेळेत पार करता यावे म्हणून राजकारण न करता सामाजिक जाणिवेच्या भावनेतून ‘टू व्हिल्स ऑफ होप’ या मोहिमेअंतर्गत माझ्या मतदार संघातील मुलींना आम्ही सायकली वाटत आहोत, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी सायकल वितरण कार्यक्रमानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरून नवीन सायकल चालविण्याचा आनंद लुटला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)