दौंड तालुक्‍यातील बंधारे पडले कोरडे

रावणगाव- दौंड तालुक्‍याच्या पूर्व भागात कमी पाऊस झालेला असल्यामुळे आत्तापर्यंत खडकवसला धरणाच्या पाण्यावरतीच या परिसरातील ऊस, मका, कडवळ, तूर, घास आदी पिकांनी तग धरला होता; परंतु मध्यंतरीच्या कालावधीत खडकवासला धरणातून देण्यात येणारे आवर्तन पुण्यात कालवा फुटल्याने बंद करण्यात आल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना मागील आवर्तन मिळाले नाहीत. तसेच दौंड तालुक्‍याच्या पूर्व भागातील रावणगाव, नंदादेवी, मळद, कौठडी, बोरिबेल, खडकी, स्वामी चिंचोली परिसरातील ओढे, विहिरी, बोरवेल यांच्या पाण्याने तळ गाठला आहे.
दिवसेंदिवस शेती पिकांना पाण्याची कमतरता जाणवू लागल्यामुळे या परिसरातील पिके जळून जाण्याच्या मार्गावरती आहेत. यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाण्याची पातळी देखील दिवसेंदिवस खालावत चाललेली असून जर लवकरात लवकर खडकवासला धरणातून वितरिका क्रमांक 32, 33, 34, 35 वरील शेती पिकांसाठी आवर्तन देण्यात आले नाही तर शेती पिकांसह माणसांच्या, जनावरांच्या तसेच पशु-पक्षांना देखील पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून शेती पिकांसाठी लवकरात लवकर आवर्तन सोडून मागील वेळी झालेला अन्याय दूर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)