दौंड तालुक्‍याच्या बंधाऱ्यांना समान पाणी वाटप करा

अमित गिरमकर ः भामा आसखेड पाण्याबाबत केली मागणी

देऊळगावराजे- भामा असखेड धरणातून भीमा नदीच्या सोडलेले पाणी दौंड तालुक्‍याच्या सर्व बंधाऱ्यात समान पद्धतीने अडवून सर्वांना समान पाणी वटपाची मागणी गार (ता. श्रीगोंदा) आणि देऊळगाव राजे (ता. दौंड) चे माजी सरपंच अमित गिरमकर यांनी केली आहे.
भामा असखेड धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी सादलगाव बंधाऱ्यात तीन मीटर, मांडवगण बंधाऱ्यात अडीच मीटर आणि सोनवडी बंधाऱ्यात दोन मिटर उंचीपर्यंत अडविले आहे; परंतु तेच पाणी खोरवडी बंधाऱ्यात दीड मिटर आणि देऊळगाव राजे बंधाऱ्यात एक मीटरपर्यंतच अडविले आहे. देऊळगाव राजे बंधाऱ्यात आधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पाणी अडविण्यास उशीर झाला आहे, त्यामुळे देऊळगाव राजे आणि खोरवडी येथील के टी वेअर बंधाऱ्यात देखील दोन मीटर उंचीपर्यंत पाणी अडवून तालुक्‍यातील सर्व शेतकऱ्यांना पाणी वाटपात समान न्याय द्यावा, अशी मागणी करण्याबरोबरच तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)