दौंड तालुक्‍याच्या पूर्व भागात गव्हाचे पीक जोमात

देऊळगाव राजे- यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे धान्य व पालेभाज्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे; पण चालू वर्षी थंडी आणि पोषक हवामानामुळे दौंड तालुक्‍यातील पूर्व भागातील गव्हाचे पीक जोमात आले असल्याचे दिसत आहे. भीमा नद्यांच्या परिसरात पाण्यामुळे बऱ्यापैकी उसाचे पीक घेतले जाते; परंतु या वर्षी पावसाने ओढ दिल्याने सर्वच पिकांना फटका बसला आहे. पावसाने यावर्षी ओढ दिल्यामुळे विहिरी, बोअरला पाणी कमी झाले आहे; पण भीमा नदीला अजून पाणी असल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी उसाचे पीक मोडून गव्हाचे पीक घेतले आहे. त्यामध्ये लोकवन गोल्ड 2189 आदी जातीच्या बियाणांच्या पेरण्या करण्यात आल्या आहेत, तसेच गव्हाला पोषक वातावरण असल्यामुळे त्याची वाढ चांगली झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)