दौंड तालुक्‍याच्या पूर्व भागात पाण्याचे स्रोत अटू लागले

रावणगाव- दौंड तालुक्‍याच्या पूर्व भागातील रावणगाव, मळद, नंदादेवी, खडकी, बोरिबेल परिसरातील पाण्याचे स्रोत आटू लागल्याने दिवसेंदिवस पिकांसाठीचा पाणी प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ऊस, गहू , मका, ज्वारी, घास, कडवळ इत्यादी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली आहेत; परंतु मार्च महिन्यातच ओढे, विहरी आणि बोअरवेलच्या पाण्याने तळ गाठल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि गरजेनुसार पिकांना पाणी देणे कठीण होऊ लागले आहे. पाण्याच्या आवर्तनास दिवसें दिवस विलंब होत असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, आत्ता शेतकऱ्यांच्या नजरा कालव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या उन्हाळी वर्तनाकडे लागल्या आहेत. त्यामुळे जलसंपदा विभागाने दौंड, बारामती आणि इंदापूरच्या शेतकऱ्यांचा अंत न पाहता त्वरित कालव्याद्वारे शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)