दौंड तालुका मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन उत्साहात

वरवंड- पाटस (ता. दौंड) येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा अध्यक्ष सीताराम लांडगे यांनी दौंड तालुक्‍यातील सदस्यांना 5 लाख रुपये अपघाती विमा संरक्षण देण्याची घोषणा केली, तसेच पाटस येथे वृक्षारोपण करण्यात आले.
दौंड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने रविवारी (दि. 13) पाटस येथे पत्रकार दिनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष सीताराम लांडगे व जिल्हा संघटक अब्बास शेख हे उपस्थित होते.या कार्यक्रमात बोलताना सीताराम लांडगे यांनी सर्व पत्रकारांनी निर्भीडपणे लिखाण करावे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सर्व पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पत्रकारांच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी पत्रकार संघाचे दौंड तालुका अध्यक्ष सचिन आव्हाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा सातपुते यांनी केले, तर आभार दौंड तालुका उपाध्यक्ष प्रशांत वाबळे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी पाटस पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल यादव, हवालदार संतोष मदने, जिल्हा संघटक अब्बास शेख, हवेली तालुका अध्यक्ष महेश फलटणकर, पुजारी, दौंड तालुका उपाध्यक्ष प्रशांत वाबळे, सचिव अमोल होले, सहसचिव पूजा भोंडवे, संपर्क प्रमुख अतुल काळदाते, खजिनदार अलिम सय्यद, तालुका संघटक नेहा सातपुते, तसेच दीपक चौधरी सदस्य
विनोद गायकवाड, परशुराम निखळे , योगेश रांधवण हे उपस्थित होते .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)