दौंड तालुका खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षांवर हल्ला

पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि त्यांच्या अंगरक्षकांनी केला हल्ला

केडगाव- दौंड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष लक्ष्मण पांडुरंग दिवेकर यांच्यावर पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवाजी रामभाऊ दिवेकर आणि त्यांचा अंगरक्षक सागर (पूर्ण नाव आणि पत्ता समजलेला नाही) यांनी धारदार शस्त्राने खुनी हल्ला केला असून, या हल्ल्यात अध्यक्ष दिवेकर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी केडगाव (ता. दौंड) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर रात्री उशिरा त्यांना पुण्याला हलवण्यात आले आहे. या घटनेने तालुक्‍यात खळबळ उडाली असून, हल्लेखोर पसार झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, हे दोघेही राहत असलेल्या कडेठाण गावच्या सांजोबा देवाची यात्रा रविवार आणि सोमवारू (दि. 28 आणि 29) या दोन दिवस होती. सोमवारी (दि. 29) रात्री लक्ष्मण दिवेकर हे यात्रेनिमित्त असणारा तमाशा (शिळा फड) पाहण्यासाठी बसले असता, शिवाजी दिवेकर आणि त्यांचा अंगरक्षक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी लक्ष्मण दिवेकर यांच्यावर वार केला. अचानक झालेल्या हल्ल्याने लक्ष्मण दिवेकर यांनी वार हातावर घेतले; परंतु त्यांच्या पाठीला, डोक्‍यावर आणि बोटासह हातावर गंभीर जखम झाली आहे. त्यांनी हल्लेखोरांच्या हातातील कोयता हिसकावून घेतला; पण हल्लेखोर हल्ला करून पसार झाले आहेत. घटनेनंतर लक्ष्मण दिवेकर यांना उपचारांसाठी केडगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर रात्री उशिरा त्यांना पुणे येथे हलवण्यात आले. घटनास्थळी यवत पोलीस निरीक्षक सुरज बंडगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट दिली आहे. भर यात्रेत अशा प्रकारची घटना घडल्यामुळे कडेठाण गावासह परिसरात खळबळ निर्माण झाली आहे, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)