दौंड गोळीबार प्रकरण : शिंदे याची रवानगी न्यायालयीन कोठडीत

पुणे – दौंड येथे बेछूट गोळीबार करून तिघांची हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सीआरपीएफ जवानची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे.
संजय शिंदे असे न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेल्याचे नाव आहे. शिंदे हा भारतीय रिझर्व्ह बटालियनचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहे. मटक्‍याच्या पैशाच्या देवाण-घेवाणीतून झालेल्या वादातून त्याने 14 जानेवारी रोजी दौंडमधील मोरी चौक आणि बोरावके नगरमध्ये बेछूट गोळीबार करत तिघांची हत्या केली होती. शिंदे याने शासकीय पिस्तुलामधून झाडलेल्या गोळ्यांमुळे परशुराम गुरूनाथ पवार (वय 33 वर्षे रा. वडारगल्ली, दौंड), गोपाळ काळुराम शिंदे (वय 35 वर्षे रा. वडारगल्ली, दौंड) यांचा नगरमोरी चौकात, तर अनिल विलास जाधव (वय 30, रा. चोरमले वस्ती, गोपाळवाडी, ता. दौंड) यांचा चोरमले वस्ती येथे मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आरोपी संजय शिंदे फरार झाला होता. पोलिसांनी त्याला मोबाईल लोकेशवरून सुपे (ता. पारनेर, जि. नगर) येथे त्याला जेरबंद केले होते. त्याच्या अंगाची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तुल आणि 12 जिवंत काडतुसे सापडली होती. तर दहा काडतुसे त्याने दौंड येथे फायर करण्यासाठी वापरली होती. या प्रकरणात पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी शिंदे याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)