दौंडे कॉलनीमध्ये लोक वर्गणीतून जल वाहिनीचे काम पूर्ण

कामशेत, (वार्ताहर) – कामशेतमधील दौंडे कॉलनीत लोक सहभागातून अंतर्गत जल वाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले. “गाव करील ते राव करणार नाही.’ या म्हणीप्रमाणे कामशेत येथील दौंडे कॉलनी येथे काम पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्यात आले.

साधारण 1500 फूट लांबीची 3 इंची ही जल वाहिनी असून त्यासाठी नागरिकांनी वर्गणी जमा करून काम पूर्ण केले. सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत दौंडे यांच्या अथक्‌ प्रयत्नातून व सर्व नागरिकांच्या सहभागातून हे काम पूर्ण झाले. जल वाहिनीमुळे येथील दोनशे नागरिकांचा पाण्याचा प्रश्‍न सुटला. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच ग्रामपंचायत निधीवर अवलंबून न राहता लोक वर्गणीतून केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कामशेतच्या सरपंच सारिका रमेश शिंदे, ग्रामसेवक बाळासाहेब मतकर, पंचायत समिती सदस्या कुंभार, बाळकृष्ण काळे, चंद्रकांत दौंडे, सोपान दौंडे, अतुल कारले, शंकरराव शिंदे, वामनराव झिटे, बाळासाहेब साठे, गुलाब भानुसघरे, दिनेश घारे, दिनेश पटेकर, नितीन भिलारे, भाऊ चौधरी व सर्व ग्रामपंचायत सदस्य लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)