दौंडमध्ये 9 जणांवर हद्दपारची कारवाई

दौंड -गणेशोत्सव आणि बकरी ईद काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, म्हणून दौंड पोलीस स्थानकांतर्गत 9 जणांवर हद्दपारची कारवाई केल्ल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली. गणेशोत्सव आणि बकरी ईद सणाच्या कालावधीत शांतता राहावी, या अनुषंगाने पोलीस स्थानकात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने सीआरपीसी 110 प्रमाणे व्यंकटेश महादू राठोड (रा. सोनवडी, ता. दौंड), शंकर सोमलू चव्हाण (रा. सोनवडी ता. दौंड), अमर तुफानसिंग परदेशी (रा. मलठण, ता. दौंड), संजय साहेबराव गुन्नर (रा.खोरवडी ,ता. दौंड) तर सीआरपीसी 144 (3)प्रमाणे शाहरुख अब्दुल कुरेशी (रा.ता. दौंड), दत्ता सुदाम काची (रा. सोनवडी, ता. दौंड), अजीम हबीब सय्यद (रा. ता. दौंड), अरबाज नजीर कुरेशी(रा. ता. दौंड), आसिफ कासम कुरेशी (रा. ता.दौंड) यांच्यावर कारवाई करून दि.25ऑगस्ट ते दि.5सप्टेंबर पर्यंत हद्दीपारची कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)