दौंडमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त संचलनाचा सराव

दौंड – दौंड शहरात स्वतंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा, महाविद्यालयांसहीत शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच काही शाळा, महाविद्यालयात ध्वजवंदना, ध्वजगीत, कवायत तसेच संचलन याचा सराव करुन घेतला आहे. दौंड शहरातील सेंट सेबॅस्टीयन हायस्कूलमध्ये संचलन सराव करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून ध्वजवंदन संचलनाचा सराव करुन घेतला जात आहे. तर, दौंड शहरातील नवीन मध्यवर्ती शासकीय इमारतीतील दौंड शहरातील मुख्य ध्वजारोहण समारंभाची तयारी सुरु करण्यात आली आहे. दौंड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून इमारतीचा परिसर स्वच्छ केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)