दौंडमध्ये सर्वधर्मियांतर्फे अत्याचाराचा निषेध

आरोपींना कडक शासन करण्याची मागणी

यवत-दौंड शहरातील मुस्लीम समाजाच्या पुढाकाराने कठूआ येथील असिफा व उन्नाव येथे झालेल्या अत्याचाराचा तीव्र निषेध केला. तसेच पीडितांना जलद न्याय मिळावा व दोषींना कडक शासन व्हावे या मागणीसाठी दौंड शहरात शुक्रवारी (दि. 20) मूक मोर्चाचे आयोजन केले होते. सर्वधर्मीय नागरिक नराधमांच्या कृत्याच्या विरोधात तीव्र निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.

शुक्रवारच्या नमाज पठणानंतर शाही आलमगीर मस्जिद येथून मूक मोर्चाला सुरुवात झाली. उर्दू शाळेच्या शेख आकसा, शेख अयमन या विद्यार्थिनींनी यावेळी आपल्या भावना व्यक्‍त केल्या. त्यांनी यावेळी शिक्षणाची कास धरून प्रसंगी बळकट होऊन अशी आव्हाने परतवून लावण्यासाठी मुलींनी बळकट होण्याचे आवाहन सर्व मुलींना केले. शिक्षिका यांनी निवेदनाचे वाचन केले. हे प्रकरण जलद गतीने चालवावे व या घटनेतील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली. या मोर्चात आमदार ऍड. राहुल कुल आणि नगराध्यक्षा शीतल कटारिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
कठूआच्या असिफा व उन्नावच्या निर्भयाला जलद न्याय मिळावा व दोषींना कडक शासन व्हावे. यासाठी दौंड शहरातील मुस्लीम समाजाच्या पुढाकाराने हा मूक मोर्चा काढण्यात आला होता. हा निषेध मोर्चा शांततेत दौंड पोलीस ठाण्याच्या आवारात आल्यावर दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी मोर्चेकरांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)