दौंडमध्ये श्रेयवादाचे राजकारण रंगले

दौंड- शहरातील उड्डाणपुलावर अनेक दिवसांपासून पथदिवे बसविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. त्याचे उद्‌घाटन मंगळवारी (दि. 15) सायंकाळी आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रेमसुख कटारिया, नगरसेवक जिवराज पवार यांची भाषणे झाली. नगराध्यक्षा शीतल कटारिया, नागरिक हित संरक्षण मंडळ आरपीआय आघाडीचे नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
दरम्यान या पथदिव्यंचे उद्‌घाटन मंगळवारी (दि. 15) सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि मित्र पक्षांच्या नगरसेवकांनी केले होते, त्यामुळे एकाच कामाचे दोन वेळा उद्‌घाटन झाल्याने कामाच्या श्रेयवादासाठी असे झाले असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
यावेळी बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले की, मागील आमदारांपेक्षा चार पट निधी माझ्या कार्यकाळात तालुक्‍यासाठी आणला नाही तर मी विधानसभेची निवडणूक लढणार नाही. आम्ही विकासकामाबाबत नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. आज या पथदिव्यांच्या लोकार्पण समारंभाला एवढी मोठी गर्दी जमली आहे, ही गर्दी म्हणजेच सकाळी झालेल्या कृतीला चपराक असून अशा प्रकारच्या चुकीच्या प्रथा शहरात चालू देणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)