दौंडमध्ये महिलेचा खून करून मृतदेह जाळला

दौंड- दौंड शहरातील रेल्वेच्या मालधक्का परिसरात एका अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
दौंड शहरातील टपाल कार्यालयासमोरून मालधक्क्‌याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज (दि.12) सकाळी हा मृतदेह आढळून आला आहे. मृत महिलेचे अंदाजे वय 22 ते 25 दरम्यान आहे. मध्यरात्री किंवा पहाटे सदर महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिला पेटवून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मृतदेहाजवळ पाच लिटरचे एक रिकामे कॅन आढळून आल्याने रॉकेल किंवा पेट्रोल ओतून तिला जाळण्यात आले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. रेल्वेच्या कॅरेज ऍण्ड वर्क्‍स (सी ऍण्ड डब्ल्यू) कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर मृतदेह सापडल्याने रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली आहे.
दौंड पोलिस ठाण्याचे कर्मचारी व अधिकारी सकाळी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी पंचनामा करून मृतदेह लिंबाचा पाला टाकून झाकला. दौंड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन अधिकारी सौरभ अग्रवाल यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.
दौंड पोलिसांनी सदर मृतदेह विच्छेदनासाठी शहरातील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केला आहे. परंतु, तेथे विच्छेदनासाठी आवश्‍यक महिला वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने सायंकाळपर्यंत विच्छेदन झालेले नव्हते. याबाबत रेल्वे पोलिस निरीक्षक देवसिंग बाविस्कर म्हणाले की, सदर महिलेला जाळण्यात आल्याने ओळख पटविणे अवघड जात असले तरी तिच्या अंगावरील कपडे, कर्णफुले, जोडवी, बांगड्या आदींच्या साह्याने ओळख पटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.आकस्मिक मृत्यु म्हणुन या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)