दौंडमध्ये भाडेतत्त्वावर राहणाऱ्या परप्रांतियांची नोंद पोलीसांत करा

पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांचे आवाहन

दौंड- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भा.द.वी. 144 प्रमाणे घर आणि जागा भाडेतत्त्वावर देताना भाडेकरुंची पुर्ण माहीती, पुरावे नगरपरिषद तसेच संबंधीत ग्रामपंचायत आणि पोलीस स्टेशनमध्ये देणे बंधनकारक आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या घरमालकांवर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. या विषयीची जनजागृती तसेच शोध मोहीम दौंड पोलीसांकडून सुरु असून यामुळे गुन्हेगारी आटोक्‍यात आणण्यात यश मिळत असल्याचे दौंडचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी सांगितले.
दौंड तालुक्‍यात औद्योगिक वसाहती तसेच रेल्वे जंक्‍शन परिसरात परप्रांतीयांची संख्या अधिक आहे. या शिवाय दौंड शहरात व्यवसायानिमित्त आलेल्या परप्रांतीय छोट्या मोठ्या व्यावसायिकांनीही चांगला जम बसविला आहे, अशावेळी भाडेतत्त्वावर घर अथवा खोली देण्याऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. परंतु, याची माहिती पोलीस यंत्रणेला कळविली जात नसल्याने गुन्हा घडलाच तर तपासात अडथळे येतात, अशी काही प्रकरणे पुढेही आली आहेत.
यासंदर्भात दौंडचे पोलीस महाडीक यांनी सांगितले की, भारतीय संवीधान प्रमाणे देशातील नागरीक कोठेही राहू शकतो तो ज्या भागात, गावात रहात आहे, त्या बाबतची सर्व माहीती संबंधीत ग्रामपंचायत व जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये असणे बंधनकारक आहे. परंतु, परीसरात वास्तव्यास असणाऱ्या अनेक परप्रांतीयांकडे स्वत:चे ओळखपत्र नाही, त्यांची कुठलीही नोंद ग्रामपंचायत अथवा पोलीसांमध्ये आढळत नाही. ते ज्या घर मालकांकडे वास्तव्यास आहेत; अपवाद सोडला तर त्यांच्याकडे राहणाऱ्या अशा परप्रांतीयां विषयीची काही माहीती उपलब्ध होवू शकत नाही. गेल्या काही काळात रेल्वे स्टेशनवरील भांडणे, हल्ले यासह हाणामारी, खून अशा गुन्ह्यांत परप्रांतीय गुन्हेगारी वृत्तीचे लोक पोलीसांनी जेरबंद केले आहेत. तर तालुक्‍यातील काही गावांत परप्रांतीयांनी स्थनिकांना हाताशी धरुन चक्क रेशन कार्ड, मतदान कार्ड तयार केली असल्याचीही चर्चा आहे. याचाही शोध घेणे तितकेच महत्वाचे आहे. भविष्यात ग्रामिण भागात ही अशा बेकायदा वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीयांकडून, भाडेकरुंकडून उदभवू शकणाऱ्या समस्या, धोके यांचा विचार करता प्रशासनाने या बाबतीत वेळीच व तातडीने दखल घेणे गरजेचे असल्याचे पोलीस निरीक्षक महाडीक यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)