यवत- भांडगाव (ता. दौंड) येथील रोकडोबानाथ विद्यालयात सोमवार (दि. 10) पासून जिल्हा क्रीडा परिषद पुणे आणि रोकडोबानाथ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेत तालुक्‍यातील 90 विद्यालये सहभागी झाली असून, यामध्ये 14, 17, 19 वयोगटांतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाल्या आहेत. 185 संघामध्ये कबड्डी स्पर्धा होतील.
या कबड्डी स्पर्धेचे उद्‌घाटन पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते सोमवारी (दि. 10) करण्यात आले. यावेळी दौंड पंचायत समितीचे सभापती झुंबर गायकवाड, माजी सभापती मधुकर दोरगे, जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, भांडगावच्या सरपंच कमल टेळे, उपसरपंच रवींद्र दोरगे, भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पोपटराव थोरात, उपाध्यक्ष भाऊसाहेब ढमढेरे, रोकडोबानाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)