दौंडमध्ये केरळच्या महापुरातील विस्थापितांसाठी प्रार्थना

दौंड- केरळ येथील महापुरामुळे विस्थापित झालेल्यांचे संसार पुन्हा उभे राहावे, याकरिता दौंड येथील ईदगाह मैदानावर विशेष प्रार्थना करण्यात आली.
शहरात आज बकरी ईदनिमित्त भीमेकाठी असलेल्या ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठणानंतर धर्मसंदेश देताना शाही आलमगीर मशिदीचे मौलाना नुमान रझा यांनी ही प्रार्थना केली. ते म्हणाले की, ईदनिमित्त प्रेषित महंमद पैगंबर यांचे विचार आणि तत्त्वांचा अंगीकार करण्याची नितांत आवश्‍यकता आहे. प्रेषितांच्या अनुयायांकडून काही चुका झाल्या असल्यास त्यांना क्षमा व्हावी. अडचणीत असलेल्या नागरिकांची मदत करण्यासह सर्वांना प्रगतीचे मार्ग दाखवावे. समाजात सौख्य व सौहार्द नांदावे, सुबत्ता अवतरावी आणि प्रत्येकाचा सर्वांगीण विकास व्हावा. युवा पिढीला सुबुध्दी द्यावी.
केरळ येथील महापुरामुळे मोठी हानी झाली असून, पूरग्रस्तांचे जीवन पूर्वपदावर येण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात, दौंड अर्बन बॅंकेचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया, यांसह राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)