दौंडमध्ये आयकर विभागाची बांधकाम व्यावसायिकांवर धाड

  • बारामतीतील कार्यालयाचीही तपासणी

दौंड – दौंड आणि बारामती शहरात आयकर विभागाच्या धाडीत मागील आठवड्यात दौंड शहरातील एका बांधकाम व्यावसायिकावर आयकर विभागाने छापा टाकला असून या बांधकाम व्यावसायिकाची रात्रभर कसून चौकशी करण्यात आली आहे. या बांधकाम व्यावसायिकने मोठ्या प्रमाणात कर चुकवेगिरी केली असल्याचे निदर्शनास आल्याने यासंदर्भातील कामकाज सुरू असून सदर कारवाई सुरू राहणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
आयकर विभाग तसेच पोलीस प्रशासनातील सूत्रांकडून मिळालेल्या दिलेल्या माहितीनुसार वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने या धाडी टाकल्या आहेत. बारामती शहरात देखील याच बांधकाम व्यावसायिकाशी संबंधित कार्यालयावर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. ग्रामीण भागात आयकर विभागाने धाडसत्र सुरू केल्याने कर चुकवेगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ग्रामीण भागातील वाढते व्यवसाय लक्षात घेता त्या प्रमाणात आयकर विभागाला कर (महसूल) मिळत नाही; याच कारणामुळे आयकर विभागाने आपला मोर्चा आता ग्रामीण भागात वळविला असून ग्रामीण भागातील लॅडमाफिया तसेच इतर व्यासायिक व व्यापाऱ्यांना आता कर भरूनच व्यवसाय करावे लागणार आहेत. केंद्र सरकारच्या धोरणानुसार यापुढे आयकर चुकवेगिरी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी आयकर विभाग पुढे सरसावला असल्याचे पाहायला मिळत आहे.

“आयकर’चा ग्रामीण भागाकडे मोर्चा…
बांधकाम व्यावसायिकांच्या गैरकारभारांना आळा घालण्याकरिता सरकारने “रेरा ऍक्‍ट’ अस्तित्त्वात आणला आहे. याची कडक अंमलबजावणी सुरू असताना ग्रामीण भागात मात्र कायद्यातून पळवाटा काढून बांधकाम व्यावसायिक ग्राहकांबरोबरच शासनालाही लुटत आहेत. हजारो गृहप्रकल्प सध्या अपूर्णावस्थेत असून याबाबत ग्राहक सातत्याने ग्राहक मंच तसेच न्यायालयात दावे दाखल करीत आहेत. अशा वेळखाऊ प्रक्रियेतून शासनाचा महसूल बुडत असल्याने आयकर विभागाने आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here