दौंडच्या पश्‍चिम पट्ट्यात दुष्काळजन्य स्थिती

  • तलाव कोरडे पडले तर, कुपनलिकेच्या पाणीपातळी खालावली

नांदुर – दौंड तालुक्‍यातील पश्‍चिम पट्यातील ताम्हणवाडी परिसरात यंदा पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगाम धोक्‍यात येऊन त्याचा शेतीला मोठा फटका बसला आहे. जनावरांच्या चाऱ्याचे आणि पाणी टंचाईचे मोठे भीषण संकटही उभे ठाकले आहे. भर पावसाळ्यात तलाव कोरडेठाक असून विहिरी व कुपनलिका यातील पाणीपातळी घटत चालली आहे.
कमी अधिक पावसाच्या हजेरीमुळे अल्प ओलीवर शेतकऱ्यांनी अथिक अडचणीतून मार्ग काढून खरीप हंगाम जोमाने हाती घेतला. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे उभी पिके करपून जाऊन त्याची वाढ खुंटली आहे. यामुळे काबाडकष्ट करणरा शेतकरी मेटाकुटीस आला आहे. कपाशीच्या दुबार पेरण्या करूनही हाती येईल याची आज शाशवती दिसत नाही. त्यातच सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न अगोदरच होता. पाऊस लांबल्याने दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच विहिरींमधील असलेले थोडे फार पाणी ठिबकदारे पिकाला देण्यासाठी बळीराजाची धडपड सुरू आहे. विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. त्याचा दूध उत्पादकांना, शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पुरेशा पावसाभावी आज दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाले आहे.

 

ताम्हणवाडी हे गाव पावसावरती अवलंबून असल्याने या भागाला पाण्याची गरज निर्माण आहे. पाणी समस्या उन्हाळ्यात अधिक भासते. परंतु आताची परिस्थिती अत्यंत भयानक बनली आहे. त्यात हाती आलेली पिके पाण्याआभावी सोडून द्यावी लागत आहेत. पाणी नसल्याने शेतामधून उत्पन्न नाही. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. कुटुंबातील अनेक सम्स्या तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ताम्हणवाडी परिसरातील शासनाने पाहणी करून संपूर्ण कर्जमाफी करावी.
– बबन ताम्हाणे, चेअरमन, ताम्हणवाडी विविध विकास सोसायटी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)