दौंडच्या तलाठ्यांचे लेखणी बंद आंदोलन

दौंड- रावणगांव (ता.दौंड) येथील गावकामगार तलाठी शशिकांत सोनवणे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असुन याप्रकरणी सखोल चौकशी होवून तलाठी सोनवणे यांना योग्य न्याय मिळावा, या मागणीसाठी आज एक दिवसाचे लेखणी बंद आंदोलन तलाठी आणि मंडलअधिकारी यांनी केले.
यावेळी तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना तलाठी व मंडलाधिकारी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. तलाठी शशिकांत सोनवणे यांच्यावर शनिवारी (दि.9) जबरी दरोडा व शस्र बाळगणे या स्वरूपाचे खोटे गुन्हे केवळ त्यांनी अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक करणाऱ्या वाळू माफियांवर केलेल्या कार्यवाहीच्या रोषातुन सुडबुद्धिने दाखल करण्यात आले आहे, अशा प्रकारचे खोटे गुन्हे वैयक्तिक आकासापोटी दाखल करण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. तलाठी सोनवणे यांनी अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावर भविष्यात वाळू माफियांकडून सुडबुद्धिने होऊ शकतो, असे लेखी पोलिस स्टेशनला लेखी कळविलेले असताना सुद्धा हा गुन्हा वाळूमाफियांनी निर्दोष तलाठ्यावर दाखल केला आहे. तलाठी सोनवणे यांना सखोल चौकशी होउन जर न्याय मिळाला नाही तर दि.20 जुन पासुन बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)