दौंडकरवाडीतून 80 हजारांच्या तांब्यांच्या तारांची चोरी

वाकी- चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील शेलपिंपळगाव जवळील दौंडकरवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीतील स्मशानभूमीजवळील विद्युत रोहित्र जमिनीवर पाडून त्यातील शंभर केव्हीच्या 80 हजारांच्या तांब्याच्या तारा लांबविल्या आहेत. हा प्रकार शनिवारी (दि. 24) रात्री दहा ते आज (सोमवारी) सकाळी सात या वेळात घडला असून, याप्रकरणी चाकण पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर आज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे वरिष्ठ तंत्रज्ञ बाळासाहेब जगन्नाथ आरुडे (वय 47, रा. राजगुरुनगर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल ढेकणे व त्यांचे अन्य सहकारी पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)