दोष नजरेचा

हो, मला आवडते नेहमीचं जीन्स घालायला. हो, मला आवडते शॉर्ट स्कर्टस घालायला, हो मला वेस्टर्न ड्रेस घालायला खूप आवडते, मला क्रॉप कुर्तीस घालायला ही आवडते आणि हो, मी हे सगळे घालते, कारण मला आवडते. मगं कोणाला आवडो किंवा न आवडो, किंवा “मी जाड आहे म्हणून मी, हे असे कपडे घालू नये”, असे सल्ला देणाऱ्या व्यक्तींसमोर तर मुद्दाम मी हे असे कपडे घालते. मुळांत मला लोकांच्या बंधनात रहायला किंवा कोणीही माझ्यावर त्यांचे निर्णय लादलेले नाही आवडतं. मला माझ्या मनाप्रमाणे जगायलां आवडते आणि तेचं मी नेहमी करते. मगं आज लोकल ट्रेनमधे एखाद्या मुलाने मला पाहून शिट्टी वाजवली यातं दोष माझा तो कायं आहे? माझ्या कपड्यांचा या सर्वाशी काय संबंध? मी मुलगी आहे, म्हणून मी माझ्या मनाप्रमाणे जगणे हे चुकीचे आहे, हे कोणी ठरवले? मी जाड आहे, म्हणून मी हे हे घालते, हे ठरवण्याचा अधिकार लोकांना कोणी दिला?

असे लाखो प्रश्‍न मनाला आज गवसणी घालून गेले. काल परवा आमच्या शहरात कुठेतरी बलात्कार झाला, ही घटना कळाली, आणि त्या बातमीसोबतचं आरोपी अटक होण्याआधी, “तिने स्कर्ट घातला, तिची चूक होती, दोष तिचाचं आहे”, असे आपापसातील संवादही कानावर आले, आणि अक्षरशः रागाने माझी लाही लाही झाली. मी तिथे जाऊन त्या तथाकथित लोकांना सुनावले ही, परंतु त्यांच्या मधे बदल होणे दूरचं, उलट माझ्या कपड्यावरून माझीचं कानउघाडणी केली गेली. खरंच किती जुनाट विचार आहेतं या सो कॉल्ड मॉडर्न, समाजाचे!! म्हणजे एकीकडे स्त्री पुरूष समानतेचे दाखले देणार आणि दुसरीकडे हीचं लोक मुलींना त्यांच्या स्वच्छंदी जगण्यावरून, त्यांच्या मॉडर्न राहणीमानावरून बोलणार, हीचं का समानता..?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुलांनी हवे तसे मनाप्रमाणे वागायचे, हवे तसे कपडे घालायचे, मगं तेचं मुलीने केले आणि एखाद्या मुलाने तिची छेड काढली, तर लगेच त्या मुलीला दोषी ठरवणार, चूक तिची होती, तिने असे कपडे घालून अंगप्रदर्शन केले तर, कोणी ही छेड काढेलचं, असे बोलून मोकळे होणार लगेचंच,पण हा अधिकार कोणी दिला या लोकांना, या समाजाला? मुळात दोष तिचा, किंवा तिच्या कपड्यांचा नसून, “त्याच्या “, नजरेचा आहे, “त्याच्या”, विचारांचा आहे. परंतु ही गोष्ट, त्या तथाकथित लोकांच्या आणि समाजाच्या नजरेतं मात्र कधीचं येत नाही, याचे दुःख होते खरंच..।

– ऋतुजा कुलकर्णी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)