दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई ; कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण

पोलीस महासंचालकांचे कॉंग्रेस शिष्टमंडळाला आश्वासन

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौ-यावेळी युवक कॉंग्रेस व एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांना मोदींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले म्हणून पोलिसांनी केलेल्या आमानुष मारहाणीच्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्या संदर्भातील अहवाल येताच दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन आज पोलीस महासंचालकांनी कॉंग्रेस शिष्टमंडळाला दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौ-यावेळी युवक कॉंग्रेस व एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांना मोदींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले म्हणून पोलिसांनी आमानुषपणे मारहाण केली. ही अमानवीय व बेकायदेशीर कृती करणा-या पोलिसांचे तात्काळ निलंबन करून सर्व दोषींवर कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वरिष्ठ पदाधिका-यांच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्याकडे केली. कॉंग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस शिष्टमंडळाने पडसलगीकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारी असल्याचे सांगून कॉंग्रेस नेत्यांनी पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला. काळ्या फिती लावून कॉंग्रेस शिष्टमंडळाने आपल्या तीव्र भावना याप्रसंगी व्यक्त केल्या.

पोलीस महासंचालकांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त करून विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना सदर प्रकाराची चौकशी करणायाचे आदेश दिल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. तसेच चौकशीचा अहवाल येताक्षणी दोषी अधिका-यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन कॉंग्रेस शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात कॉंग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी यथवंत हाप्पे, राजन भोसले, राजेश शर्मा, सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)