दोषी नेता उमेदवार कसे काय ठरवू शकतो?

सर्वोच्च न्यायालयाची विचारणा


3 मे यादिवशी होणार फैसला

नवी दिल्ली -निवडणुकीचे राजकारण करण्याची बंदी घालण्यात आलेला दोषी नेता निवडणुकांमध्ये उमेदवार कसे काय ठरवू शकतो, अशी विचारणा आज सर्वोच्च न्यायालयाने केली. आता न्यायालय दोषी नेत्यांना राजकीय पक्षाची पदे भुषवण्यास मनाई करण्यात यावी, या मागणीवर 3 मे या दिवशी निर्णय देणार आहे.

एखाद्या प्रकरणात विशिष्ट मुदतीची शिक्षा झाल्यास दोषी नेत्याला विशिष्ट काळासाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. संबंधित काळात दोषी नेत्याला राजकीय पक्षाचे पद भुषवण्यास मनाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका भाजप नेते अश्‍विनी के.उपाध्याय यांनी दाखल केली आहे. खून, बलात्कार, तस्करी, लूट, राजद्रोह यांसारख्या गंभीर गुन्ह्याबद्दल दोषी ठरलेली व्यक्तीही राजकीय पक्ष स्थापन करू शकते आणि पक्षाची अध्यक्ष बनू शकते, याकडे याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी केंद्र सरकारची बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद यांनी पक्ष स्थापन करण्यापासून आणि पक्षाचे पद भुषवण्यापासून कुठल्याच व्यक्तीला रोखता येऊ शकणार नाही, असा युक्तिवाद केला. त्यावर न्यायालयाने निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आलेली दोषी व्यक्ती उमेदवार कशी काय निवडू शकते, अशी विचारणा केली. अशाने लोकशाहीची विश्‍वसनीयता कशी काय राखली जाऊ शकेल, असेही न्यायालयाने विचारले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)