‘दोषारोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ द्या’

नक्षलींशी संबंधप्रकरण : पोलिसांची अतिरिक्त सत्र न्यायालयात मागणी

पुणे – बंदी असलेल्या सीपीआय (माओवादी) या संघटनेशी संबंधित असल्याचे आरोपारून अटक करण्यात आलेल्या सुधा भारद्वाज, वरनॉन गोन्साल्विस, अरुण फरेरा आणि वरवरा राव यांना पहिल्यांदा अटक केल्यापासून 25 नोव्हेंबरला 90 दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळे शुक्रवारी पोलिसांनी आरोपींचे दोषारोपपत्र दाखल करण्यास “यूएपीए’ कलमानुसार आणखी 90 दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयात केली आहे. या प्रकरणी 26 नोव्हेंबर रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

-Ads-

दरम्यान, पहिल्यांदा अटक करण्यापूर्वी भारद्वाज, गोन्साल्विस, फरेरा, राव यांना सर्वोच्च न्यायालयाने राहते घरी नजरकैदेत ठेवण्याचे आदेश देऊन दिलासा होता. सदर नजरकैदेची मुदत संपुष्टात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना पुन्हा अटक केली. नजरकैद ही न्यायालयीन कोठडी आहे आहे की नाही हे स्पष्ट नसल्याने कोणतीही तांत्रिक अडचण राहू नये, यासाठी मुदतवाढ मागत असल्याचे सांगण्यात आले आहे.

जिल्हा सरकारी वकील उज्वला पवार यांनी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांचे मदतीने संबंधित आरोपींचे दोषारोपत्र दाखल करण्यास 90 दिवस मुदतवाढ मिळावी, असा अर्ज न्यायालयात दाखल केला. याबाबत वरवरा राव यांचे वकील रोहन नहार, फरेराच्या वतीने सिद्धार्थ पाटील यांनी युक्तिवाद करण्यास मुदत मिळावी, असे सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)