दोषारोपपत्र अर्धवट असल्याने मला जामीन द्या

अॅड.गडलिंग यांची मागणी : इलेक्ट्रॉनिक क्लोनकॉपी नसल्याचे दिले कारण

पुणे – पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेच्या अनुषंगाने न्यायालयात दाखल केलेले दोषारोपपत्र सोबत न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेली इलेक्‍ट्रॉनिक क्‍लोनकॉपी जोडलेली नसल्याने दोषारोपपत्र अर्धवट आहे. त्यामुळे मला जामीन देण्यात यावा तसेच दोषारोपपत्राची इलेक्‍ट्रॉनिक क्‍लोनकॉपी मिळावी अशी मागणी आरोपी अॅड.सुरेंद्र गडलिंग यांनी विशेष सत्र न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात सोमवारी केली.

दरम्यान, याप्रकरणी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.शिवाजी पवार यांनी न्यायालयास सांगितले की, आरोपींच्या घर झडती दरम्यान हार्डडिस्क, पेनड्राईव्ह जप्त करण्यात आले आहेत. दोषारोपपत्रात महत्वपूर्ण डाटाची कागदपत्रे ती साक्षांकित करुन देण्यात आली आहे. जप्त केलेल्या हार्डडिस्कचा डाटा 25 टीबी असून एका हार्डडिस्क मधील कागदपत्राच्या पाच छायांकित कॉपी करणे यास वेळ लागत आहे. पुणे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा आणि कलिना प्रयोगशाळा यांच्याकडून जसे इलेक्‍ट्रॉनिक डाटा कागदपत्रे उपलब्ध होतील तशी ती देण्यात येतील. दरम्यान, सरकारी वकील उज्वला पवार यांनी सांगितले की, अद्याप एफएसएल कडून पोलिसांना अंतिम अहवाल सादर झालेला नाही. आत्तापर्यंत तपासाच्या अनुषंगाने ज्या गोष्टींवर तपासाची कमान उभी आहे ती महत्वपूर्ण कागदपत्रे दोषारोपपत्रा सोबत देण्यात आली आहे. दरम्यान, गडलिंग यांनी यावर आक्षेप घेत 17 एप्रिल रोजी माझ्या घरावर छापा टाकून इलेक्‍ट्रॉनिक डाटा पोलिसांनी जप्त केला, त्यानंतर एक महिन्यात त्यांना एफएसएलची कॉपी मिळाली मात्र, आम्हाला याबाबत कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यास विलंब करत असल्याचा आक्षेप घेतला.

22 नोव्हेंबरला जामीन अर्जांवर सुनावणी
पोलिसांनी अटक केलेले अॅड.सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे, रोना विल्सन व महेश राऊत यांनी जामीन मिळावा याकरिता न्यायालयात अर्ज केला आहे. याप्रकरणी सदर संशयित आरोपींच्या वकीलांनी युक्तिवाद केला असून सुरेंद्र गडलिंग 22 नोव्हेंबर रोजी न्यायालयात स्वत:ची बाजू मांडणार आहे. याचदिवशी संबंधित चौघांच्या जामीन अर्जावर सरकारी वकील उज्वला पवार या पोलिसांची बाजू मांडणार आहेत. दरम्यान, अरुण परेरा या आरोपीने त्याला तपास अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा अर्ज न्यायालयात केला होता. याबाबत सरकारी वकील परेरा यांचे वकीलांना त्यांची बाजू मांडणारा अर्ज देणार असून त्यावर न्यायालयात पुढील काळात सुनावणी होणार आहे.

तिघांच्या कोठडीत तीन डिसेंबर पर्यंत वाढ
सीपीआय माओवादी या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी संबंधित असल्याचे कारणावरुन पोलिसांनी अॅड.सुधा भारद्वाज, अरुण परेरा, व्हर्णन गोन्साल्वीस यांना अटक केली आहे. सध्या तिघे न्यायालयीन कोठडीत असून त्यांची मुदत सोमवारी संपुष्टात आल्याने, पोलिसांनी तिघांची न्यायालयीन कोठडी मुदत 14 दिवसांनी वाढवून मिळावी अशी मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केल्याने संबंधित तिघांचा तीन डिसेंबर पर्यंत कारागृहातील मुक्काम वाढला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)