पुणे जिल्हा: दोन हजार रोहीत्रांचा वीजपुरवठा खंडीत

आणखी आगडोंब उसळण्याची चिन्हे
शेतकऱ्यांची विद्युत मोटार वर्षभरात जास्तीत जास्त एक हजार तास चालते; परंतु महावितरण वीजबील दोन हजार तासांची आकारणी असल्याने शेतकरी वीजबील भरण्यास दिरंगाई करत आहेत. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास मका, गहू, डाळिंब बागा, द्राक्ष, केळीच्या बागा पाण्याअभावी जळून जाणार असून शेतकरी संतप्त झाल्याने या वीज प्रश्‍नांवर आणखी आगडोंब उसळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

डिकसळ – इंदापूर तालुक्‍यातील तसेच उजनी बॅंक वॉटरवरील शेती पंपाचा वीज पुरवठा महावितरणकडून सुमारे दोन हजार रोहित्रांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यामुळे शेतकरी वर्गात कमालीची नाराजी पसरली असून पाण्याअभावी पिके जळून जाणार असल्याची धास्ती बळीराजा लागली आहे.

सध्या मार्च ऍण्डमुळे थकीत वीजबील वसुलीची महावितरणकडून इंदापूर तालुक्‍यातील सुमारे 193 कोटी रुपयांची थकबाकी वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरू आहे. इंदापूर आणि वालचंदनगर सबस्टेशनमधील सुमारे आठ हजार शेतीपंप आता बंद असल्याने “पाणी हाय..पण वीज’ नसल्याची स्थिती निर्माण झाली, त्यामुळे जनावरांना व माणसांना पिण्यासाठी पाणी मिळणे देखील कठीण झाले आहे. सध्या सुरु असलेल्या कडक उन्हामुळे जमिनीची पाणीपातळी कमालीची खालावली असल्याने विहिरी, बोअरवेल, ओढे-नाल्यांना पाणी कमी आहे, त्यामुळे शेतातील उभी पिके सुकून चालली आहे, त्यातच महावितरण विभागाने कारवाईचा बडगा उगारल्याने उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांची अवस्था “धरण उशाला कोरड घश्‍याला’ अशीच काही झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)