दोन हजाराची नोट रद्द करणार आहात काय? 

तृणमुल नेते दिनेश त्रिवेदींचा सरकारला सवाल 
नवी दिल्ली – सरकारने देशात रोकड टंचाई का निर्माण झाली याची वस्तुनिष्ठ माहिती जनतेला द्यावी आणि सरकार दोन हजार रूपयांची नोट रद्द करणार आहे काय याचाही खुलासा सरकारने करावा अशी मागणी तृणमुल कॉंग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी केली आहे.

त्रिवेदी हे संसदेच्या अर्थविषयक समितीचेही सदस्य आहे. ते म्हणाले की सरकारने दोन हजार रूपयांची नोटच चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याने बाजारात सध्या रोकड टंचाई निर्माण झाली आहे अशी आपली माहिती आहे. या प्रकरणाची नेमकी माहिती सरकारने जनतेला द्यायला हवी त्यासाठी त्यांनी तातडीने निवेदन प्रसृत करावे अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे. पीटीआयशी बोलताना ते म्हणाले की आपल्याला येणाऱ्या समस्येची कारणे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे. सरकार जनतेला अशा किरकोळीने धुडकाऊ शकत नाही. सरकारने जनतेपासून वस्तुस्थिती लपवता कामा नये असेही ते म्हणाले.

मला स्वत:ला गेल्या अनेक दिवसांपासून दोन हजार रूपयांची नोट बॅंकेतून मिळालेली नाही. हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्यानंतर देशात निर्माण झालेली रोकड टंचाई दूर करण्यासाठी सरकारने दोन हजार रूपयांची नोट चलनात आणली होती. पण आता या नोटाच गायब झाल्या आहेत त्यामुळे ही स्थिती उदभवली असून लोकांच्या मनात या नोटेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे तो सरकारनेच दूर केला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. देशात चलन आणिबाणी निर्माण झाल्याचा आरोप कालच या पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)