दोन हजारांच्या नोटा चालू राहणार

नोटाबंदीनंतर बहुतांश नोटा बॅंकांत आल्या परत

नवी दिल्ली: मार्च-एप्रिलमध्ये दक्षिण भारतात नोटाटंचाई निर्माण झाली होती. प्रामुख्याने 2000 च्या नोटा बाजारातून गायब होत्या. ही नोट बंद होणार असल्याची चर्चाही होती. पण 2000 ची सध्याची नोट चलनात कायम असेल, रद्द होणार नाही, असे केंद्राने पुन्हा स्पष्ट केले.

-Ads-

नोटाबंदी दरम्यान बॅंकेत जमा झालेल्या नोटांची तपासणी व मोजणी जवळपास पूर्ण झाली आहे. या काळात बॅंकेत जमा झालेल्या बाद नोटा, चलनात आणलेल्या नोटांपेक्षा अधिक नाहीत, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
चलनातून बाद झालेल्या सर्व नोटा बॅंकेत परत आल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. बाद केलेल्या 99 टक्के नोटा बॅंकिंग प्रणालीत परत आल्या, असे रिझर्व्ह बॅंकेनेही मागील वर्षी सांगितले होते. पण अशा नेमक्‍या किती नोटा बॅंकेत जमा झाल्या, याबाबत सरकार किंवा रिझर्व्ह बॅंक यापैकीच कोणीही आजवर स्पष्ट माहिती दिली नव्हती. आता मात्र सरकारने यासंबंधी पहिले स्पष्टीकरण दिले आहे.

केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 ला 500 व 1000 च्या नोटा चलनातून बाद केल्या. त्या वेळी चलनातील एकूण नोटांपैकी 86 टक्के नोटा 500 व 1000 रुपये मूल्याच्या होत्या. बाद झालेल्या या नोटा बदलून घेण्यासाठी दोन महिन्यांची मुदत होती. त्या काळात या जुन्या नोटा विविध स्वरूपात बॅंकेत जमा करून बदलून घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

आगामी काळात लोकांनी नोटांचा वापर कमीत कमी करून डिजिटल व्यवहाराचा वापर जास्तीत जास्त करावा यासाठी केंद्र सरकार आणि बॅंका प्रयत्न करणार आहे. भारतासारख्या देशात हे काम होण्यासाठी बराच काळ लागणार आहे. मात्र सरकार या क्षेत्रात प्रदीर्घ काळ काम करणार आहे. गेल्या काही वर्षापासून डिजिटल व्यवहारामध्ये काही प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)