दोन सराईत जेरबंद

पिंपरी – घरफोडी व मोबाईल चोरी करणाऱ्या दोन सराईतांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे.

संभाजी भीमा वाघमारे (वय-21, रा. कल्हाट, मावळ) किरण रामदास जाधव (वय-20, रा. खालुंब्रे, खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव येथे गस्त घालत असताना इंद्रायणी महाविद्यालयाजवळ आरोपी चोरलेले मोबाईल विकणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून पोलिसांनी 29 हजार रुपयांचे 3 मोबाईल जप्त केले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता आरोपींवर तळेगाव दाभाडे येथील एका घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखा युनीट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी किरण आरुटे, नारायण जाधव, दत्तात्रय बनसुडे, मयुर वाडकर, संदीप ठाकरे, राहूल खारगे, भीवसेन सांडभोर यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)