दोन सराईत अल्पवयीन ताब्यात

पिंपरी – दुचाकी आणि लॅपटॉप चोरी करणाऱ्या दोन सराईत अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पाच मोटार सायकल आणि तीन लॅपटॉप असा एकूण 2 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस मोहननगर परिसरात गस्त घालत असताना दोन अल्पवयीन मुले दुचाकीवरून भरधाव वेगात जाताना आढळून आली. पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडून त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता ती चोरीची असल्याचे समजले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी तळेगाव हद्दीत वाहन चोरी आणि लोणवळा हद्दीत लॅपटॉप चोरी केल्याचे समजले. त्यांच्याकडून पाच मोटार सायकल आणि तीन लॅपटॉप जप्त केला. यामुळे पिंपरी, तळेगाव आणि लोणावळा पोलीस ठाण्यातील चोरी आणि घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस कर्मचारी राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, महादेव जावळे, श्रीकांत जाधव, अजिनाथ सरक, जावेद बागसिराज, प्रतिभा मुळे, अविनाश देशमुख, उमेश वानखडे, रोहित पिंजरकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)