दोन सराईतांना अटक

पिंपरी – रावण साम्राज्य टोळीच्या एका सदस्यासह वाकड पोलिसांनी मोक्‍कातील एका फरार आरोपीला वाकड येथून अटक केली आहे.

रतन रोकडे (वय-21, रा. रोकडे वस्ती, चिखली) असे मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या रावण साम्राज्य टोळीतील आरोपीचे नाव आहे. तर मंगेश नामदेव पालवे (वय 28, रा. मोरेवाडी, ता. मुळशी) असे पौड पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीचे नाव आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील कस्पटे चौकात रविवारी दुपारी दीडच्या सुमारास वाकड पोलीस ठाण्यातील पथक कारवाई करत होते. त्यावेळी देहूरोड पोलीस ठाण्यातील मोक्का कारवाई झालेला आणि रावण साम्राज्य टोळीतील फरार आरोपी रतन रोकडे माउली टी सेंटर येथे उभा असल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचे दोन, देहूरोड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा एक आणि वाकड पोलीस ठाण्यात दरोडा घातल्याप्रकरणी एक असे एकूण चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. देहूरोड पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायदा (मोक्का) अन्वये कारवाई केली आहे. वाकड पोलिसांनी पुढील कारवाईसाठी त्याला देहूरोड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

दुसऱ्या कारवाईत शनिवारी (दि.6) वाकड पोलीस ठाण्यातील टीम क्रमांक तीन आणि 17 हे भूमकर चौकात कारवाई करत होते. त्यावेळी मंगेश पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो पौड पोलीस ठाण्यातील एका खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे उघड झाले. त्याच्यावर पौड पोलीस ठाण्यात तीन आणि तळेगाव पोलीस ठाण्यात एक असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत. वाकड पोलिसांनी पुढील कारवाईसाठी त्याला पौड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, पोलीस उप निरीक्षक हरीश माने, सहायक पोलीस फौजदार शिंपी, पोलीस कर्मचारी कांता बनसोडे, रमेश गायकवाड, विक्रम कुदळ, गणेश गिरीगोसावी, सूरज सुतार, नितीन गेंजगे, मुकेश येवले, सचिन जगताप, वेलापुरे, प्रशांत गिलबिले, अविनाश गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)