दोन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार

पिंपरी : पिंपरीत दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी १४ व १६ वर्षीय आरोपी नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीमधील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे. अत्याचार करणारे आरोपही अल्पवयीन आहे. ३ जानेवारीपासून १८ एप्रिलपर्यंत मुलींवर अत्याचार केले. ३० वर्षीय महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात या प्रकरणाबाबत फिर्याद दिली आहे.

-Ads-

शाळेमध्ये मुलींना शिक्षकांनी गुड टच आणि बॅड टच याबाबत माहिती दिली. त्यानंतर या मुलींनी या घटनेची माहिती शिक्षकांना दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शिक्षकांनी ही बाब मुलींच्या पालकांना सांगितली. याप्रकरणी पीडित मुलींच्या आईने पिंपरी पोलिसांत अल्पवयीन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)