दोन संशयित पाकिस्तान समर्थक हॅकर्सना अटक

देशभरातील 500 वेबसाईट केल्या हॅक


पाकिस्तान आणि दहशतवादाला चिथावणी देण्याचा उद्योग


“आयएसआय’शी संबंधित हॅकरशी संपर्क

नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने आज दोन संशयित पाकिस्तान समर्थक काश्‍मीरी हॅकर्सना पंजाबमधून अटक केली. या दोन्ही हॅकरनी देशातील 500 वेबसाईट हॅक केल्या असल्याचे म्हटले जात आहे. शाहिद मल्ला (वय 28) आणि आदिल हुसैन तेली (वय 20) अशी या दोघांची नावे आहेत, असे विशेष सेलचे उपायुक्‍त पी.एस. कुशवाह यांनी सांगितले.

खात्रीशीर माहितीच्या आधारे या दोघांना 26 आणि 27 एप्रिल दरम्यानच्या रात्री पंजाबमधील दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे घालून अटक करण्यात आली. या दोघांचे ऑनलाईन उद्योग आणि प्राथमिक माहितीनुसार हे दोघेजण “टीम हॅकर्स थर्ड आय’ या देशविघातक गटाचे सदस्य आहेत. काश्‍मीरमध्ये एप्रिल मे 2017 दरम्यान सरकारने जरी सोशल मिडीयावर “वर्ज्युअल प्रायव्हेट नेटवर्क’द्वारे निर्बंध घातली होती तरी त्यातून पळवाट कशी काढायची हे काश्‍मीरी युवकांना शिकवण्यातही हे दोघेजण सहभागी होते. हे दोघेही पाकिस्तानातील काही भारतविरोधी हॅकरच्या संपर्कात असायचे.

यापैकी काही हॅकरना पाकिस्तानी गुप्तचर संस्था “आयएसआय’ चा पाठिंबाही असल्याचे कुशवाह यांनी सांगितले.
या दोघांनी भारतविरोधी आणि देशद्रोही पोस्टही टाकल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल फोन, सिम कार्ड, इंटरनेट डोंगल आणि मेमरी डिव्हाईजही जप्त करण्यात आली आहेत. याची तपासणी दिल्ली पोलिसांकडून केली जाणार आहे. त्यानंतर यादोघांचे आणखीन देशविघातक उद्योग समजू शकतील.

बी.टेक आणि बीसीएचे विद्यार्थी…
अटक केलेल्यांपैकी मल्ला हा पंजाबमधील राजपोरा येथील एका कॉलेजातला बी.टेक. च्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. तो मूळचा जम्मू काश्‍मीरमधील बारामुल्लाचा रहिवासी आहे. तर तेली हा जालंधरमधील संस्थेत बीसीएच्या अखेरच्या वर्षाचे शिक्षण घेतो आहे. तो मूळचा जम्मू काश्‍मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील असून दोघेही भाड्याच्या घरामध्ये रहात होते, असे पोलिसांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)