दोन शोरूममध्ये चोरीचा प्रयत्न

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) – सातारा शहरालगत असलेल्या दोन शोरूममध्ये चोरीचा प्रयत्न झाला. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात असलेल्या क्रिस्टल होन्डा या चारचाकी शोरूमच्या खिडकीचे गज कापत चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर शोरूमचे व्यवस्थापकाच्या केबीनचा कुलुप तोडले. शोरूमची दिवसभराची रक्कम ठेवलेल्या लॉकरच्या केबिनचे कुलुप तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांना त्यात यश आले नाही. त्यानंतर चोरट्यांनी शेजारीच असलेल्या एका शोरुमच्या खिडकीची काच काढली. चोरट्यांनी दोन्ही ठिकाणी केलेल्या चोरीच्या प्रयत्नामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.याप्रकरणी क्रिस्टल होन्डाचे कर्मचारी अविनाश बजरंग गुरव रा. ढ़नगर कॉलनी,सातारा यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेचा तपास हवा. सणस करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)