दोन वर्षात 72 हजार सरकारी पदे भरणार

मुंबई – राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये दोन वर्षात 72 हजार पदे भरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केला. यावर्षी 36 हजार पदांची भरती करणार असल्याचेही ते म्हणाले. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला.

विरोधकांनी अंतिम आठवडा प्रस्तावात राज्यातल्या सुमारे दोन लाख रिक्त पदांच्या जागांवर सरकारला घेरले. पहिल्या टप्प्यात 36 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 36 हजार पदे भरण्यात येणार आहेत. कृषी विभागात 2 हजार 500, पशुसंवर्धन विभागात 1 हजार 47, मत्स्यविकास विभागात 90 , ग्रामविकास विभागात 11 हजार, आरोग्य विभागात 10 हजार 568, गृह विभागात 7 हजार 111, सार्वजनिक बांधकाम विभागात 8 हजार 337, जलसंपदा विभागात 8 हजार 227, जलसंधारण विभागात 2 हजार 423 तर नगरविकास विभागात 1500 अशी पहिल्या टप्प्यातील एकूण 36 हजार पदे भरणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
11 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)