दोन वर्षात जीएसटी परिषदेच्या 30 बैठका, 918 निर्णय

नवी दिल्ली – गेल्या दोन वर्षात जीएसटी परिषदेच्या 30 बैठका झाल्या असून त्यात 918 निर्णय घेण्यात आले आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखालील जीएसटी परिषदेच्या दोन वर्षांत 918 बैठका झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने रविवारी दिली आहे. नवीन करव्यवस्थेसंबंधी कायदे, नियम आणि करांचे दर निश्‍चित करण्यासाठी या बैठका झाल्या. या परिषदेत सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश आहे. 15 सप्टेंबर 2016 रोजी जीएसटी परिषदेची स्थापना करण्यात आली होती.

आजवर झालेल्या 918 बैठकांमध्ये जीएसटी कायदे, नियम, करांचे दर, भरपाई, कर मर्यादा आदी ठरवण्यासाठी 918 निर्णय घेण्यात आले. यापैकी 96 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक निर्णयांची केंद्र सरकारच्या 294 वटहुकुमांद्वारा अंमलबजावणी करण्यात आली आहे, असे अर्थमंत्रालयाच्या निवेदनात जाहीर करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जीएसटी परिषदेच्या कार्याने एक नवीन अध्याय सुरू झाला असून केंद्र सरकार आणि राज्य सरकारे मिळून अप्रत्यक्ष करव्यवस्थेबाबत सामूहिक निर्णय घेतात. विचाराधीन मुद्‌द्‌यांची सविस्तरपणे चर्चा करता यावी यासाठी जीएसटी परिषदेच्या बैठकीपूर्वी केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारांच्या अर्थमंत्र्यांची बैठक होते. झालेल्या 30 जीएसटी बैठकांच्या कार्यक्रम पत्रिका 4,730 पानांच्या आणि बैठकांचे अहवाल 1,394 पानांचे असल्याचेही अर्थ मंत्रालयाच्या निवेदनात सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)