दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ‘जाळ अन्‌ धूर संगटच’ निघाला होता… 

दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ‘जाळ अन्‌ धूर  संगटच’ काढणारा सैराट प्रदर्शित झाला होता. २९ एप्रिल २०१६ ही तारीख मराठी चित्रपटसृष्टी साठी खूप महत्वाची तारीख आहे. सैराटने रेकॉर्डब्रेक कमाई करत तब्बल ११० करोड रुपये कमावले. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे सैराट महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला. सगळ्यांना ‘झिंगाट’ करत एक खूप महत्वाचा संदेश देणाऱ्या सैराटने भल्याभल्यांना त्याचं वेड लावलं. आज दोन वर्ष पूर्ण झाल्या नंतरही सैराटची लोकप्रियता कायम आहे. 

खरं तर नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची कहाणी सौम्य प्रेमकथा म्हणून लिहिली होती. त्यांचा उद्देश असाच होता की ह्या चित्रपटाने मागच्या काही चित्रपटांपेक्षा जास्त व्यवसाय करावा. चित्रीकरणासाठी सोलापूर जिल्ह्यातील जेऊर ह्या त्यांच्या स्वतःच्या मूळ गावाची निवड करण्यात आली होती. सैराट महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, कोलकाता, भिलाई, रायपूर, कर्नाटक, तेलंगण या ठिकाणी इंग्रजी उपशीर्षकांसहित प्रदर्शित करण्यात आला. सैराट मराठी चित्रपट सृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. सैराटने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत आत्तापर्यंत ११० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाची ६६व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली होती. रिंकू राजगुरू हिला “एका चैतन्यशील मुलीचे प्रभावी चित्र रंगवण्यासाठी” २०१५ मध्ये ६३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात स्पेशल ज्युरी पुरस्कार / विशेष उल्लेख पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. मराठी चित्रपटांच्या इतिहासात सैराट कायमच सगळ्यांच्या लक्षात राहील हे मात्र नक्की.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
15 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)