दोन वर्षांत 360 दहशतवाद्यांचा खात्मा: सीआरपीएफ प्रमुख

नवी दिल्ली: गेल्या दोन वर्षांत काश्‍मीर खोऱ्यात 360 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, अशी माहिती सीआरपीएफचे महासंचालक राजीव राय भटनागर यांनी दिली. सुरक्षा दलांच्या एकामागून एक सुरू असलेल्या मोहिमांना यश मिळत आहे. यामुळे काश्‍मीर खोऱ्यातील दहशतावाद संपुष्टात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

काश्‍मीर खोऱ्यातील तरुणांना दहशतवादाचे आकर्षण असल्याने ते तिकडे वळतात; पण त्यातून त्यांना काहीही लाभ होणार नाही, ही गोष्ट त्यांना समजावली पाहिजे, युवक दहशतवादाकडे वळणार नाहीत यासाठी आणि जे तिकडे वळले आहेत त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे देशातील सर्वात मोठ्या अर्धसैनिक दलाच्या प्रमुखांनी म्हटले आहे.

सुशासन, लष्कर-राज्य पोलीस दल आणि सीआरपीफ यांच्यातील परस्पर ताळमेळ, पारदर्शिता आणि विविध मोहिमा यांनी काश्‍मीर खोऱ्यातील लोकांचा विश्‍वास वाढवण्याचे काम केले आहे. काश्‍मीर खोऱ्यात 60 पेक्षा अधिक बटालियन्स( सुमारे 60,000 जवान) तैनात करण्यात आलेल्या आहेत. दहशतवाद्यांच्या कुख्यात म्होरक्‍यांचा सफाया करण्यात आला आहे. फियादीन हल्ले रोखण्यात यश आले आहे असे सांगून भटनागर यांनी पुढे म्हटले आहे, की अगदी आवश्‍यक असल्याशिवाय पॅलेट गन्सचा वापर केला जात नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)