दोन वर्षांत अग्रगण्य विद्यापीठात टिमवि आघाडीवर राहील

डॉ. दीपक टिळक : 29 व्या पदवीप्रदान सोहळा

पुणे- उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्याबाबत विद्यापीठ प्रयत्नशील आहे. येत्या दोन वर्षांत देशातील अग्रगण्य विद्यापीठात टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आघाडीवर राहील, अशी ग्वाही टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांनी शनिवारी येथे दिली.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा “टिमवी’ 29 व्या पदवीप्रदान सोहळ्यात ते बोलत होते. कुलपती विश्‍वनाथ पळशीकर, उपकुलगुरू डॉ. गीताली मोने-टिळक, विद्यापीठाच्या प्रशासकीय सल्लागार डॉ. प्रणती टिळक, प्रभारी कुलसचिव अभिजीत जोशी, अजित खाडिलकर, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता आदी उपस्थित होते. उद्योजक प्रतापराव पवार, डॉ. आनंद देशपांडे, ख्यातनाम चित्रकार सुहास बहुळकर यांना सन्माननीय डी. लिट. पदवीने गौरविण्यात आले. याप्रसंगी 4 हजार 316 विद्यार्थ्यांना प्रदवी, 89 विद्यार्थ्यांना पी.एचडी. तर 33 विद्यार्थ्यांना एम.फिल. पदवी देण्यात आली. तसेच, “गौरव ज्ञानयुक्त कर्माचा’ या पुस्तकाचे प्रकाशनही झाले.

डॉ. टिळक म्हणाले, विद्यापीठात संशोधनात्मक दृष्टीकोन असावा, अधिक प्रयत्न सुरू आहे. लवकरच विद्यापीठाच्या मेहनतीला फळ येईल. काळ झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे एका विद्यार्थ्याला एक पदवी घेऊन थांबता येणार नाही. कारण काळाच्या ओघात अनेक पदव्या कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी नवीन येणारे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. शिक्षण हे राष्ट्र आणि समाजासाठी आवश्‍यक आहे. त्यामुळेच राष्ट्रकारण हेच ध्येयकारण म्हणून विद्यापीठाने जपले आहे. शिक्षण क्षेत्रात कार्य करताना अनेक आरोप होतात. ते आरोप धुवून काढून शिक्षणाचा उत्तम दर्जा निर्माण करण्यासाठी विद्यापीठ अतोनात परिश्रम करीत आहे.
आनंद देशपांडे म्हणाले, टिळक महाराष्ट्र विद्यापीठामागे लोकमान्यांची प्रेरणा असल्याने हे ऐतिहासिक विद्यापीठ आहे. या विद्यापीठात व्यावसायिक व शैक्षणिक अभ्यासक्रम राबविले जात असून, व्यवसायिक अभ्यासक्रम ही काळाची गरज आहे. त्यामुळेच येत्या काही वर्षांत विद्यापीठाचा चेहरा मोहरा बदललेला असेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.
बहुळकर म्हणाले, मी एक साधा पदवीका घेतलेला चित्रकार आहे. मात्र, आज डी. लिट. पदवीच्या सन्मानाने स्वत:ला भाग्यवान मानतो. टिळकवाड्याची आणि माझा जुना संबंध आहे. गणेशोत्सवातील कार्यक्रम ऐकण्यासाठी कायम यायचो. चित्रकारितेचे धडेही टिळक स्मारकात घेतल्याचे त्यांनी सांगितले. विनोद सातव यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)