दोन लाख जणांनी पुर्ण केली अमरनाथ यात्रा

जम्मू – दक्षिण काश्‍मीर मधील हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या अमरनाथ देवस्थानची सध्या यात्रा सुरू असून काल पर्यंत एकूण दोन लाख भाविकांनी ही यात्रा पुर्ण करून तेथे दर्शन घेतले अशी माहिती यात्रा अधिकाऱ्यांच्यावतीने देण्यात आली. या यात्रेचा कालचा 18 वा दिवस होता. काल एकूण 7 हजार 214 जणांनी तेथे दर्शन घेतले त्यांची संख्या जमेला धरली तर काल पर्यंत एकूण 2 लाख 2 हजार 705 भाविकांनी तेथे दर्शन घेतले आहे.

आज कडक सुरक्षा व्यवस्थेत 3603 यात्रेकरूंचा जथा जम्मूहून अमरनाथकडे रवाना करण्यात आला. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी तब्बल चाळीस हजार सुरक्षा जवान तेथे तैनात करण्यात आले आहेत. यात्रा मार्गावर सगळीकडे सुरक्षा पहारे बसवण्यात आले असून कडक तपासणीशिवाय यात्रेकरूंनाही तेथे प्रवेश दिला जात नाही. दरवर्षी ही यात्रा 48 दिवसांची असते पण यंदा मात्र त्यात आठ दिवसांची कपात करण्यात आली असून ती 40 दिवसांचीच करण्यात आली आहे. अमरनाथ हे स्थळ पेहलगाम पासून 46 किमी अंतरावर तर बालतालपासून 14 किमी अंतरावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)