दोन लाखांचे नळ चोरीला

पिंपरी – बांधकाम सुरु असलेली इमारतीमध्ये बसविण्यासाठी आणून ठेवलेले महागड्या कंपनीचे 1 लाख 90 हजार 800 रुपये किमतीचे नळ अज्ञात चोरटयांनी चोरून नेले. ही घटना नुकतीच सुसगाव येथे घडली.

संदीप भास्कर बडे (वय-37, रा. गांधीनगर झोपडपट्टी, नीता पार्क सोसायटी जवळ, येरवडा) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलीस उपनिरीक्षक नंदराज गभाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसगाव येथे ऑक्‍सफोर्ड पॅराडाईज सोसायटीचे काम सुरु आहे. या सोसायटीमधील फ्लॅटमध्ये बसविण्यासाठी जॅग्वार कंपनीचे नळ आणले होते. ते नळ एका स्टोअर रूम मध्ये ठेवले होते. एका मोपेड दुचाकीवरून आलेल्या दोघांनी नळ चोरून नेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)