दोन लाखांचे गोमांस पकडले

पिंपरी – पोलिसांनी सापळा रचून दोन लाख रुपये किंमतीचे गोमांस घेऊन जाणारा टेम्पो पकडला. शनिवारी (दि. ) दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय-25, रा. शिवाजीनगर, पुणे ) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार, मोहम्मद शेख, मोहम्मद कुरेशी, शहनवाज कुरेशी आणि मोसीन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी यांना एका टेम्पोतून गोमांस विक्रीसाठी जात असल्याची खबर मिळाली. त्यांनी ही माहिती चिंचवड पोलिसांना दिली. चिंचवड पोलिसांनी अप्पासाहेब चिंचवडे चौकात सापळा रचून ही कारवाई केली. आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)