दोन रेल्वेगाड्यांची समोरासमोर धडक

मिस्त्र : मिस्त्रमध्ये अलेक्झांड्रिया शहरात दोन रेल्वेगाड्यांमध्ये समोरासमोर धडक झाली आहे. या झालेल्या धडकेत 37 जणांचा बळी गेला आहे, तर 123 जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहेत. 

या अपघातात रेल्वेचे अनेक डबे रुळावरुन घसरले. हा भीषण अपघात खुर्शीद स्टेशनवर झाला. या अपघातात जखमी झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे, तर ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात झाला तेव्हा प्रचंड मोठा आवाज झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले  आहे. जखमींवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, अपघाताचं नेमकं कारण अजून कळू शकलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)