दोन मोबाईल चोरांना अटक

पिंपरी – पादचारी महिलेचा मोबाईल हिसकावून पळणारे दुचाकीस्वार रिक्षावर जाऊन आदळले. यावेळी नागरिकांनी चोरट्यांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. ही घटना पिंपरीतील गांधीनगरजवळ शुक्रवारी दुपारी घडली.

उमर इस्माईल शेख (वय-19, रा. आंबेडकरनगर, देहू) आणि त्याचा अल्पवयीन साथीदार, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अर्चना मोतीराम मेंगडे (वय-20, रा. महाराष्ट्र कॉलनी, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अर्चना या गांधीनगर येथील जय गणेश वरदहस्त येथून रस्त्याने पायी मोबाईलवर बोलत चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. मात्र काही अंतरावर गेल्यावर चोरटे एका रिक्षाला जाऊन धडकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)