दोन मार्गांवर “सिंक्रोनायझेशन’ चाचणी

मनपा ते ब्रेमन चौक आणि स्वारगेट ते हडपसर मार्गांची निवड


20 मार्गांवर प्रस्तावित; प्रशासनाची माहिती


वाहतुकीला येणार वेग

पुणे – शहरातील प्रस्तावित 20 मार्गांपैकी सुरुवातीला 2 मार्गांवर प्रायोगित तत्त्वावर सिंक्रोनायझेशन चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी मनपा ते ब्रेमेन चौक आणि स्वारगेट ते हडपसर हे मार्ग निवडण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांत चाचणी सुरू होईल, अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

वाहतूक पोलिसांकडून शहरातील मुख्य आणि वर्दळीच्या 20 मार्गांचा सर्व्हे करण्यात आला होता. सर्व्हेदरम्यान रस्त्यांवरील चौकांची संख्या, होणारी कोंडी, लागणाऱ्या वेळेचा प्राथमिक अभ्यास करून या मार्गांवरील सिग्नलचे सिंक्रोनायझेशन करण्याचे सूचवण्यात आले आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या मदतीने हे काम करण्यात येणार असून तसा प्रस्ताव वाहतूक पोलिसांकडून स्मार्ट सिटीला देण्यात आला होता. यावर स्मार्ट सिटी आणि महापालिका प्रशासनाकडून काम सुरू असून सुरवातीला दोन मार्गांवर सिंक्रोनायझेशन चाचणी घेण्याचे ठरवण्यात आले आहे. चाचणीदरम्यान येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात येणार असून यानंतर उर्वरीत मार्गांवर सिंक्रोनायझेशन कार्यान्वित केले जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

….न्युक्‍लिऑनिक्‍स एजन्सीकडून काम
सिंक्रोनायझेशनसाठी मार्गांवर लागणारा टायमिंग वाहतूक पोलिसांकडून स्मार्ट सिटीला यापूर्वीच देण्यात आला आहे. त्यामुळे चाचणीसाठी निवडण्यात आलेल्या दोन मार्गांवर नव्याने टायमिंग सेट करावा लागणार आहे. हे काम “न्युक्‍लिऑनिक्‍स ट्रॅफिक सोल्यूशन’ या एजन्सिला देण्यात आले आहे, असे सांगण्यात आले आहे.

….असा झाला सर्व्हे
वाहतूक पोलिसांकडून सकाळी तसेच गर्दीवेळी पीक अवर्समध्ये शहरातील रस्त्यांवर प्रत्यक्ष दुचाकीवरून हा सर्व्हे करण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे वाहतूक करून विशिष्ट अंतर कापण्यासाठी लागणाऱ्या वेळेची नोंद घेण्यात आली. तसेच, सुट्टीच्या दिवसांचीही नोंद घेण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या वेळेची नोंद स्मार्ट सिटीकडे देण्यात आली आहे.

….काय आहे सिग्नल सिंक्रोनायझेशन?
प्रवासादरम्यान वेळेची बचत होऊन वेगाने वाहतूक होणे हा सिंक्रोनायझेशनचा मुख्य उद्देश आहे. एखाद्या रस्त्यावरून जात असताना रस्त्यातील चौकात पोहोचताक्षणी ग्रीन सिग्नल लागतो. यामुळे वाहनचालकांना कुठेही थांबावे लागत नसून वाहतुकीचा वेग वाढून सुरळीत वाहतूक होते. दरम्यान, शहरात “एटीएमएस’ (अॅडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार आहे. मात्र, याला जास्त कालावधी लागणार असून सध्या मॅन्युअली टाईमींग सेट करून सिंक्रोनायझेशनचे काम तातडीने करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)